पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली इराणच्या राष्ट्रपतींची भेट; आखातामधील संघर्षादरम्यान पहिल्यांदाच समोरासमोर चर्चा

by Team Satara Today | published on : 31 August 2026


दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज किर्गिस्तानमध्ये होत असलेल्या एससीओ संमेलनादरम्यान इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांची भेट घेतली. सध्या आखातामध्ये असलेली तणावपूर्ण परिस्थिती आणि अमेरिका व इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही पहिलीच भेट असल्याने ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. याआधी नरेंद्र मोदी आणि मसूद पेजेश्कियान हे २०२४ साली रशियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या  ब्रिक्स संमेलनामध्ये भेटले होते.

अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धासह अनेक प्रसंगी भारत आणि इराण यांनी उभयपक्षी चर्चा केली आहे. तसेच या संघर्षाच्या काळातही भारताची इराणसोबतची मैत्री कायम राहील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, या भेटीनंतर आता पुढील महिन्यात  भारतात  होणाऱ्या ब्रिक्स संमेलनासाठी इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान हे भारतात येण्याची शक्यता आहे.

यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस इराण आणि अमेरिका-इस्राइलमध्ये युद्धाला सुरुवात  झाल्यापासून  इराणचे राष्ट्रपती आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेली ही पहिलीच भेट आहे. आजच्या  भेटीत या दोन्ही नेत्यांमध्ये  नेमकी कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली हे अद्याप  स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र दोन्ही नेत्यांमध्ये होर्मुझमधीन नाकेबंदीबाबत चर्चा झाली असावी, असे म्हटले जात आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांची भेट झाल्यानंतर इराणच्या भारतातील दूतावासाने आपल्या अधिकृत एस्क अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात इराणी दूतावासाने लिहिले की, इराणचे  राष्ट्रपती मसूज पेजेश्कियान यांनी किर्गिस्तानच्या आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली.  मसूज पेजेश्कियान हे शांघाई सहकार्य संघटनेचं शिखर  संमेलन आणि शांघाई  प्लस शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी आणि त्यांना संबोधित करण्यासाठी गेले होते, असे इराणी दूतावासाने सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अभिजीत दीपके यांच्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; सरन्यायाधीशांची महत्त्वाची टिप्पणी, ५ सप्टेंबर रोजी दिल्लीत रॅली
पुढील बातमी
मानवी आरोग्यास घातक ठरणारे सणांमधील ध्वनिप्रदूषण पूर्णपणे थांबवले पाहिजे - विद्यानंद बापटांची रोखठोक भूमिका

संबंधित बातम्या