कॉलेजमध्ये शिक्षण सुरू असतानाच नॅशनल हायवे प्रोजेक्ट्समध्ये इंटर्नशिप करण्याची संधी; दरमहिना २० हजार पगार, नोंदणी सुरू

by Team Satara Today | published on : 24 August 2026


मुंबई  : कॉलेजमध्ये शिक्षण सुरू असतानाच प्रत्यक्ष इंटर्नशिपमधून काम शिकण्याला चांगली संधी मानली जाते. यामुळे उमेदवारांना व्यावहारिक ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवण्याची संधी मिळते. अशा संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने NHAI हिवाळी इंटर्नशिप कार्यक्रम २०२६-२७ आणि टर्म इंटर्नशिप कार्यक्रम २०२७ साठी नोंदणी सुरू केली आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ही भारत सरकारची प्रतिष्ठित संस्था आहे. जी देशातील राष्ट्रीय महामार्गाचा विकास, देखरेख आणि त्याच्याशी निगडित इतर कामे करते. ही संधी विशेषत: अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना इंजिनिअर, टेक्नोलॉजी, रोड सेफ्टी, मॅनेजमेंट, लॉ, फायनान्स, मिडिया आणि पायाभूत सुविधा क्षेत्रासारख्या क्षेत्रांमध्ये करिअर करायचं आहे. देशभरात सुरू असलेल्या १२५ नॅशनल हायवे प्रोजेक्टवर उमेदवारांना काम करता येईल. व्यावसायिक अनुभव मिळण्यासोबतच उमेदवारांना दरमहा चांगले विद्यावेतनही मिळेल.

NHAI इंटर्नशिप २०२६ साठी नोंदणी सुरू

नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडून विंटर इंटर्नशिप कार्यक्रम २०२६-२७ आणि टर्म इंटर्नशिप कार्यक्रम २०२७ सुरू केला आहे. त्यासाठी १०८० हून अधिक जागा भरल्या जाणार आहेत. २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत या जागांसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत आहे. यात निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २० हजार रूपये विद्यावेतन मिळेल. यासाठी कुठलीही परीक्षा घेतली जाणार नाही तर पात्रता यादी आणि कागदपत्रे पडताळणी यातून उमेदवारांची निवड केली जाईल. hipsatnhai.digitalindiacorporation.in या वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवारांना नोंदणी करावी लागेल.


पात्रता काय?

    मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल, इलेक्ट्रिकल, सीएस, ईसीई,

    मेकॅनिकल किंवा एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंगमध्ये बीई/बीटेक करत असावे.

    संबंधित क्षेत्रातील ME/M.Tec केलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

    एआयसीटीई (AICTE) मधून फायनान्स, एचआर किंवा ऑपरेशन्समध्ये एमबीए केलेले उमेदवार.

   याव्यतिरिक्त, डेटा सायन्स/एआय/लॉ, बीए (एलएलबी), मास कम्युनिकेशन,

    एचआर/ऑर्गनायझेशनल बिहेविअर या विषयांमध्ये पूर्ण-वेळ पदवी/पदव्युत्तर 

    अभ्यासक्रम करणारे उमेदवार देखील नोंदणी करू शकतात.

    पदवी अभ्यासक्रमात किमान ६०% गुण मिळवलेले असावेत.

    उमेदवार ज्या विद्यापीठात शिकत आहे, ते विद्यापीठ इंटर्नशिप कार्यक्रमासाठी पात्र

     विद्यापीठे/संस्थांच्या यादीत असणे आवश्यक आहे.

    कॉलेज किंवा संस्थेच्या प्रमुखांनी उमेदवारांची इंटर्नशिपसाठी शिफारस केलेली असावी.

    ज्या उमेदवारांनी आपली पदवी पूर्ण केली आहे, ते या इंटर्नशिपसाठी नोंदणी करण्यास पात्र नसतील.


निवड प्रक्रिया कशी पार पडेल?

तुमचे युनिवर्सिटी कॉर्डिनेटर तुमच्या अर्जाची पडताळणी करतील. त्यानंतर शिफारस झाल्यानंतर NHAI प्रशासक अर्जांमधून उमेदवारांची निवड यादी तयार करतील. निवड झालेल्या उमेदवारांना ईमेल किंवा SMS द्वारे ऑफर लेटर्स मिळतील. इंटर्नशिपसाठी उमेदवारांना NHAI प्रकल्प स्थळी उपस्थित राहावे लागेल, जिथे ते वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतील. हिवाळी इंटर्नशिप डिसेंबर ते जानेवारी फक्त एक महिन्याची असते. मात्र टर्म इंटर्नशिप सहा महिन्यांची असते.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सह्याद्री अतिथीगृहाबाहेर मराठा तरुणांचे घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन; आंदोलक अचानक एकत्र आल्याने पोलिसांचीही धांदल
पुढील बातमी
कॉकरोच जनता पार्टीचे सौरव दासच्या घराचा पत्ता लीक करणाऱ्यांना न्यायालयाचा दणका; समन्स बजावले, सोशल मीडियावरील व्हिडिओही हटवले

संबंधित बातम्या