मीरा बोरवणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची बातमी 'फेक'

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून नियुक्तीचे खंडन

by Team Satara Today | published on : 05 May 2026


सातारा: माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची बातमी गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियासह विविध माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होती. मात्र, ही बातमी पूर्णपणे निराधार आणि खोटी असल्याचे आता स्पष्ट झाले असून, राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) अधिकृत पत्रक काढून या वृत्ताचे  खंडन केले आहे.

​कालपासून सातारा जिल्ह्यासह राज्यभरात मीरा बोरवणकर यांच्या नियुक्तीच्या चर्चांना उधाण आले होते. अनेक नेटिझन्सनी ही बातमी खरी मानून सोशल मीडियावर अभिनंदनाचे संदेशही शेअर केले होते. बोरवणकर यांची शिस्तप्रिय अधिकारी म्हणून असलेली ओळख पाहता, महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत आल्याने अनेकांनी या वृत्तावर विश्वास ठेवला. मात्र, अशा प्रकारचा कोणताही शासन निर्णय झालेला नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सोशल मीडियावर पसरणारे हे वृत्त केवळ अफवा असून नागरिकांनी अशा कोणत्याही विनाशाईत माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन 'डीजीआयपीआर' फॅक्ट चेकच्या माध्यमातून करण्यात आले आहे. दरम्यान, या अधिकृत स्पष्टीकरणामुळे गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात कडाक्याच्या उन्हामुळे 'समर डायरिया'चे संकट; बालकांच्या आरोग्याबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन

संबंधित बातम्या