'द फॅमिली मॅन'चा या बहुचर्चित सीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सीरिजमध्ये आणखी एका दमदार अभिनेत्रीची एन्ट्री

by Team Satara Today | published on : 28 October 2024


Maratha Community : मराठा समाज विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार? युती-आघाडीचे भवितव्य मतदारांच्या हाती | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya /* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-parent:""; mso-padding-alt:0cm 5.4pt 0cm 5.4pt; mso-para-margin-top:0cm; mso-para-margin-right:0cm; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0cm; line-height:115%; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; mso-bidi-font-size:10.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi; mso-fareast-language:EN-US;}

'द फॅमिली मॅन'चा या बहुचर्चित सीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांचीही उत्सुकता शिगेला पोहचली असल्याचं पाहायला मिळतंय. सीरिजच्या शुटिंगला सुरुवात झाल्याची चर्चा आहे. अशातच आता या सीरिजमध्ये आणखी एका दमदार अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ती कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत.

'द फॅमिली मॅन'च्या तिसऱ्या सीझनमध्ये अभिनेता जयदीप अहलावत खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबतीला आता निर्मात्यांनी निम्रत कौरची निवड केली आहे. निम्रत कौरने 'लंच बॉक्स'मध्ये जबरदस्त अभिनय केला होता. तिने 'होमलँड' आणि 'वेवर्ड पाइन्स' या अमेरिकन मालिकांमध्येही काम केले आहे. ती अक्षय कुमारसोबतही झळकली आहे. आता तिला 'द फॅमिली मॅन'मध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

दरम्यान, सीरीजचे नागालँडमध्ये शूटिंग सुरू असून व्यक्तिरेखेबाबत अद्याप कोणतीही विशेष माहिती समोर आलेली नाही. 'द फॅमिली मॅन 3' मध्ये मनोज बाजपेयीची भूमिका श्रीकांत कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आपल्या पत्नीसोबतचे नाते सुधारण्याचा प्रयत्न करेल. काळानुसार आव्हाने वाढल्याचं दिसेल. ही सीरिज 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे आता हा सीझन कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आजपासून दीपोत्सवाला प्रारंभ
पुढील बातमी
किडनी डॅमेज होण्याची 5 लक्षणे सकाळीच दिसून येतात

संबंधित बातम्या