मोहनलाल यांनी केला 'दृश्यम ३'बद्दल मोठा खुलासा

दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल सध्या त्याच्या 'बरोज थ्रीडी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा फँटसी थ्रिलर सिनेमा प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शनही मोहनलालने केले आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

एका कार्यक्रमादरम्यान मोहनलालने 'दृश्यम ३'बद्दल भाष्य केले. माध्यमांशी बोलताना त्याने अभिनेता अजय देवगणसोबतच्या 'दृश्यम' क्रॉसओव्हरबद्दल खुलासा केला. तो म्हणाला, "सध्या याबद्दल कोणतीही ठोस माहिती नाही. 'दृश्यम ३' प्रक्रियेत आहे. मात्र, चांगला सिक्वेल बनवणे खूप मोठे आव्हान असते. पण एक दिवस हा चित्रपट तयार होईल यासाठी मी प्रार्थना करतो."

२०१३ मध्ये दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी दिग्दर्शित केलेला 'दृश्यम' हा मल्याळम क्राईम थ्रिलर चित्रपट सुपरहिट ठरला. मोहनलालने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. प्रेक्षकांच्या पसंतीमुळे 'दृश्यम'चा रिमेक कन्नड, तामिळ, तेलुगु आणि हिंदी अशा विविध भाषांमध्ये करण्यात आला. हिंदी रिमेकमध्ये अभिनेता अजय देवगणने प्रमुख भूमिका निभावली होती.

'दृश्यम'च्या 'दृश्यम'च्या यशानंतर २०२१ मध्ये 'दृश्यम २' प्रदर्शित झाला, ज्यालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता 'दृश्यम ३'ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आणि प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मागील बातमी
श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने उद्यापासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ
पुढील बातमी
फायर फायटिंग बोट ही महाकुंभ मेळा २०२५ साठी प्रयागराजला रवाना

संबंधित बातम्या