सातारा : सातारा तालुका पोलिसांनी अवैध दारूविक्री विरोधात कडक भूमिका घेत गापूर वंदन गावच्या हद्दीत कारवाई करत देशी व विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
नारायण रामराव कणसे यांच्या गुरांच्या गोठ्याच्या आडोशाला लपवून ठेवलेली ९० मिली क्षमतेच्या २२ देशी-विदेशी दारूच्या बाटल्या तालुका पोलिसांनी जप्त केल्या. जप्त दारूची किंमत अंदाजे ८८० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी रामदास रमेश राठोड (वय ४३, रा. अंगापूर वंदन, ता. जि. सातारा) याच्याविरोधात दि. १९ रोजी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार राहुल राऊत करत आहेत.