02:51pm | Dec 07, 2024 |
थंडीच्या दिवसांत बाजारात भरपूर भाज्या एकदम ताज्या आणि फ्रेश विकायला असतात. या भाज्यांपैकीच प्रामुख्याने मेथी आणि मटार या दोन भाज्या तर कायम असतातच. हिवाळ्याच्या दिवसांत आपलीही भूक वाढलेली असते आणि खाल्लेले चांगले पचते त्यामुळे आपल्याला वेगवेगळे, चमचमीत काहीतरी खावेसे वाटते. सतत तीच ती भाजीपोळी खाऊन अनेकदा आपल्याला कंटाळा आलेला असतो. अशावेळी ताटात एखादी छानशी वेगळी भाजी असेल तर नेहमीपेक्षा ४ घास जास्तच खाल्ले जातात.
हॉटेलमध्ये गेलो की आपण ग्रेव्हीच्या वेगवेगळ्या भाज्या ऑर्डर करतो. या भाज्या खाऊन आपल्याला बरे वाटते. पण अशाच भाज्या आपण घरीही करु शकतो. कमीत कमी वेळात आणि कष्टात या भाज्या करण्यासाठी त्याची रेसिपी समजून घ्यायला हवी. पाहूयात ढाबास्टाईल किंवा हॉटेलस्टाईल मेथी मटार मलाई पनीरची भाजी घरी कशी करायची याची सोपी रेसिपी.
साहित्य :-
१. कांदा - २ कप (उभा चिरलेला कांदा)
२. पाणी - गरजेनुसार
३. काजू - १/२ कप (गरम पाण्यांत अर्धा तास भिजवलेले)
४. मेथीची पाने - २ कप
५. आलं - अर्धा इंच
६. लसूण पाकळ्या - ४ ते ५ लसूण पाकळ्या
७. हिरव्या मिरच्या - ५ ते ६ मिरच्या
८. मीठ - चवीनुसार
९. तेल - ४ ते ५ टेबलस्पून
१०. साखर - ३ टेबलस्पून
११. क्रिम / मलई - १/२ कप
कृती :-
१. सर्वात आधी मेथी निवडून त्याचे देठ न घेता फक्त पानच घ्यावीत. मेथीची पान स्वच्छ धुवून त्यात चमचाभर मीठ घालून ठेवावं, जेणेकरून भाजीत त्याचा कडवटपणा लागणार नाही.
२. आता एका मिक्सरच्या भांड्यात उभा चिरलेला कांदा, आलं, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या आणि भिजवलेले काजू व गरजेनुसार पाणी घालून त्याची एकत्रित पेस्ट तयार करून घ्यावी.
३. एका मोठ्या कढईत तेल घेऊन ते व्यवस्थित गरम करावे. गरम तेलात मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मसाला घालावा. या मसाल्याला चांगले तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यावा. मसाला १० मिनिटे परतून घेतल्यावर त्यात मटार आणि गरजेनुसार पाणी घालावे. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून ५ मिनिटे मटार छान शिजवून घ्यावेत.
४. दुसऱ्या एका भांड्यात तेल घेऊन त्यात बारीक चिरलेली मेथी हलकेच तेलावर परतून घ्यावी.
५. मटार शिजून झाल्यावर झाकण उघडून त्या ग्रेव्हीमध्ये तेलात परतून घेतलेली मेथी घालावी. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ व साखर घालावे.
६. त्यानंतर या भाजीत क्रिम किंवा मलाई घालावी. मग भांड्यावर झाकण ठेवून २ ते ३ मिनिटे ही भाजी शिजवून घ्यावी.
मेथी मटार मलाई खाण्यासाठी तयार आहे. ही भाजी आपण चपाती, रोटी किंवा नान, तंदुरी रोटी सोबत खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.
शाहूनगर येथे सुमारे लाखाची घरफोडी |
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर पोक्सो दाखल |
कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची होणार जगप्रसिद्ध कंदी पेढ्याने तुला |
आदित्यची तळमावले, साईकडेत मिरवणूक |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |