सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी दहाजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, व्यायाम करत असताना धक्का लागल्याच्या कारणातुन दहा जणांच्या युवकाने एकाला मारहाण केली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आलोक मांगवणे, आदित्य मांगवणे, चेतन परमार, आदित्या आंबेकर व अनोळखी 5 ते 6 युवक यांच्या विरुध्द आकाश राजेंद्र पवार (वय 29, रा. सदरबझार, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. 3 मार्च रोजी घडली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवा. सावंत करीत आहेत.
/* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-qformat:yes; mso-style-parent:""; mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt; mso-para-margin-top:0in; mso-para-margin-right:0in; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0in; line-height:115%; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; mso-bidi-font-size:10.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-fareast-font-family:"Times New Roman"; mso-fareast-theme-font:minor-fareast; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi;}
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा