सातारा : पैशांच्या देणेघेण्याच्या वादातून एका महिलेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार नोंद झाला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मे रोजी सकाळी सुमारे ७.३० वाजता खेड, ता. सातारा येथे ही घटना घडली. फिर्यादी जयश्री ज्ञानेश्वर कुंभार (वय ४५, रा. खेड, ता. सातारा) व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे असून पैशांच्या व्यवहाराच्या कारणावरून वाद झाला. यावेळी आरोपींनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी निजामुद्दीन खान, हसबउद्दिन खान व सहाबुद्धीन (सर्व रा. वाढे, ता. जि. सातारा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बिले करत आहेत.