04:09pm | Sep 16, 2024 |
नवी दिल्ली : अमेरिकेवर 9/11 चा हल्ला करणारा ओसामा बिन लादेन याचा मुलगा हमजा बिन लादेन जीवंत असल्याचा दावा गुप्तचर यंत्रणांनी केला आहे. हमजा हा साल 2019 मध्ये ठार झाल्याचा अंदाज होता. परंतू तो जीवंत असून अल कायदाचे नेतृत्व करीत असल्याचे म्हटले जात आहे. अफगाणिस्तानात हमजा दोनशेहून अधिक स्नायपर कमांडोच्या सुरक्षेत असून त्याने पाश्चिमात्य राष्ट्रांवर हल्ला करण्याची योजना आखल्याचे वृत्त मिरर या वृत्तपत्राने दिले आहे.
हमजा याचा भाऊ अब्दुल्लाह हा देखील या अल कायदा संघटनेत आहे. हमजा हा अफगाणिस्तानात खुलेआम फिरत असून तो त्याचे वडील ओसामा बिन लादेन याच्या अमेरिकेने केलेल्या हत्येचा बदला घेणार असल्याचे म्हटले जात आहे. हमजा आणि त्याच्या कुटुंबियाचे संरक्षण अफगाणिस्तानच्या वरिष्ठ तालिबानी नेते करीत आहेत. ते त्याची सुरक्षा करीत असून त्याला संरक्षण पुरवित आहेत.
तालिबानच्या राजवटीत 21 हून अधिक दहशतवादी संघटना कार्यरत असून ते सुसाईड बॉम्बर आणि दहशतवादी हल्ल्यासाठी तरुणांना प्रशिक्षण देत आहेत. अफगाणिस्तानातील हेलमंड, गजनी. लघमन, परवान,उरुजगन, झाबुल, नांगरहार, नुरीस्तान,बडघीस आणि कुनार या ठिकाणी अतिरेक्यांची प्रशिक्षण सुरु आहे.अफगाणी सिराजुद्दीन हक्कानी हा देखील हमजाला मदत करीत आहे. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यामुळे अल-कायदा अतिरेकी संघटनेला सुरक्षित वातावरण मिळाल्याचा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी साल 2022 मध्ये दिला होता.
हमजा हा साल 2019 मध्ये एअर स्ट्राईक हल्ल्यात ठार झाल्याचा अमेरिकेचा समज होता. परंतू त्याच्याबद्दल इतर माहिती अमेरिकन सैन्यानी दिली नव्हती. हमजा याचे वडील ओसामा याची साल 2011 मध्ये अमेरिकेने पाकिस्तानातील अबोटाबाद येथे स्पेशल ऑपरेशन राबवून हत्या केली होती. ओसामा बिन लादेन याने अमेरिकेवर केलेल्या 9/11 च्या हल्ल्यात 3000 हून अधिक अमेरिकन नागरिक ठार झाले होते.
रेकी करून ट्रॅक्टर चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश |
लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय |
पाचगणी येथे पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेचे स्वागत |
अवैध फटाका विक्री करणार्या दोघांवर गुन्हा |
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे भटक्या बैलाला रेबीजचा संसर्ग |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पोवई नाक्यावर साखर वाटप |
महिला अडचणीत असताना गृह खात्याच्या झोपा |
हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातारा शहरात उस्फुर्त स्वागत |
श्वानांचे मुखवटे झळकवून गणेश वाघमारे यांचे पालिकेसमोर आंदोलन |
सालोशी येथील बांबू हस्तकला प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद |