02:29pm | Aug 22, 2024 |
नवी दिल्ली : टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत टीम इंडियाने बाजी मारत विजेतेपद पटकावले. बार्बाडोसमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून भारतीय संघ चॅम्पियन झाला. 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकणे ही टीम इंडिया आणि चाहत्यांसाठी खूप आनंदाची बाब होती, कारण 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाचा अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभव केला होता. टी20 विश्वचषकापूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रोहित शर्मा बार्बाडोसमध्ये तिरंगा फडकवणार असल्याचे भाकीत केले होते. आता जय शाह यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलबाबतही मोठी भविष्यवाणी केली आहे.
टीम इंडियाने 2024 टी-20 विश्वचषकाद्वारे 13 वर्षांपासून सुरु असलेला आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला होता. आता जय शाह यांनी पुन्हा एकदा टीम इंडिया आयसीसी स्पर्धेत तिरंगा फडकवणार असं म्हटलं आहे. जर आम्हाला 1.4 अब्ज लोकांचा आशीर्वाद असेल तर आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्येही जिंकू, असं जय शाह यांनी सांगितलं. सीएटी अवॉर्ड्सवर बोलताना जय शाह म्हणाले, "जसे मी राजकोटमध्ये सांगितले की रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया बार्बाडोसमध्ये तिरंगा फडकवेल, येथे मी म्हणतो की 1.4 अब्ज लोकांचा आशिर्वाद मिळाल्यास चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनलमध्येही असेच करू...
पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन करत आहे, जी फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळली जाईल. त्यामुळे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार की नाही?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे पाकिस्तान या स्पर्धेच्या यजमानपदावर ठाम आहे. दुसरीकडे, पाकिस्तान दौऱ्याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणताही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. 2008 पासून टीम इंडिया पाकिस्तानमध्ये एकही सामना खेळायला गेली नसल्यामुळे 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी असेच घडण्याची शक्यता फार कमीच आहे. तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड देखील हायब्रिड मॉडेलप्रमाणे चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यास सहमत नाही. त्यामुळे आयसीसी यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भारताने 2023 मध्ये झालेल्या आशिया कपच्या वेळी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. त्यावेळी भारताचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले होते. चॅम्पियन्स ट्रॉफी निमित्तानं भारत जुन्या भूमिकेवर ठाम आहे. भारतानं 2008 नंतर पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळलेलं नाही. त्यामुळं चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारतानं पाकिस्तानला जायचा निर्णय घेतल्यास तब्बल 16 वर्षानंतर भारतीय संघ पाकिस्तानला जाईल. भारतानं भूमिका काय ठेवल्यास हायब्रीड मॉडेलनुसार देखील सामने खेळवले जाऊ शकतात. भारतानं दुबई किंवा श्रीलंकेत सामने आयोजित करण्याबाबत भूमिका घेतली आहे. पीसीबीनं भारताचे सामने लाहोरमध्ये प्रस्तावित केले होते. भारत आणि पाकिस्तान मॅच 1 मार्च 2025 रोजी प्रस्तावित करण्यात आली आहे.
रेकी करून ट्रॅक्टर चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश |
लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय |
पाचगणी येथे पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेचे स्वागत |
अवैध फटाका विक्री करणार्या दोघांवर गुन्हा |
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे भटक्या बैलाला रेबीजचा संसर्ग |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पोवई नाक्यावर साखर वाटप |
महिला अडचणीत असताना गृह खात्याच्या झोपा |
हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातारा शहरात उस्फुर्त स्वागत |
श्वानांचे मुखवटे झळकवून गणेश वाघमारे यांचे पालिकेसमोर आंदोलन |
सालोशी येथील बांबू हस्तकला प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद |