आंबेनळी घाटात मोठी दरड कोसळली; वाहतूक तात्पुरती बंद; परिस्थितीचा आढावा घेऊनच वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येणार

by Team Satara Today | published on : 01 July 2026


महाबळेश्वर : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात मंगळवारी मोठी दरड कोसळल्याने घाटातील दोन्ही बाजूंची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. दरड रस्त्यावर आल्याने वाहनांची लांबच लांब रांग लागली असून, सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल प्रशासन, पोलिस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. जेसीबी व इतर यंत्रसामग्रीच्या साह्याने दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, रस्ता वाहतुकीसाठी शक्य तितक्या लवकर खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाने नागरिक व पर्यटकांना आंबेनळी घाट मार्गाचा वापर टाळण्याचे तसेच पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. 

दरड हटविण्याचे काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावरील वाहतूक काहीकाळ बंद राहण्याची शक्यता असून, परिस्थितीचा आढावा घेऊनच वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. प्रवाशांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा हंबरडा उपस्थितांच्या काळजाला चिरून गेला
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यात पावसाचा पुन्हा जोर; नवजाला ८६ मिलिमीटरची नोंद, कोयनेत २५५६ क्युसेक आवक

संबंधित बातम्या