09:21pm | Oct 01, 2024 |
सातारा : खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दिव्यांग महिला लतिका जगताप यांचे घराचे राहते शेड खेड ग्रामपंचायत च्या वतीने विरोध करूनही पाडण्यात आले. या कारवाईचे प्रत्यक्ष कारण समजू शकले नाही मात्र या घटनेच्या निषेधार्थ दिव्यांग बांधवांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. सातारा शहर पोलिसांनी या आंदोलनात तातडीने हस्तक्षेप केला.
सातार्यात गेल्या एक वर्षापासून दिव्यांग बांधवांची सामाजिक संघटना त्यांच्या हक्कासाठी प्रचंड सक्रिय आहे. दिव्यांग बांधवांच्या संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले होते. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्हा बँकेच्या अमृत महोत्सवी सांगता समारोहाच्या प्रसंगी सातारा सैनिक स्कूलच्या मैदानावर उपस्थित राहणार आहेत. तेथून हाकेच्या अंतरावर असणार्या खेड ग्रामपंचायत हद्दीतील दलित महिलेचे घर खेड ग्रामपंचायतीने जबरदस्तीने पाडले. या महिलेने विरोध करूनही हे घर अतिक्रमणात असल्याची तक्रार झाल्याचे वृत्त आहे.
या संदर्भात संबंधित महिलेने दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेशी संपर्क करून या कारवाईची माहिती दिली. या घटनेच्या निषेधार्थ दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार, अविनाश कुलकर्णी, सुदर्शन मालवणकर, शैलेंद्र बोर्डे, नितीन शिंदे, अमोल भातुसे, नंदकुमार जगताप, दशरथ लोखंडे, आशिष चतुर, नामदेव इंगळे, मानाजी लोहार, कृष्णा पवार, शालन लोखंडे, शोभा मोरे या सदस्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर अचानक दुपारी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यामुळे सातारा शहर पोलिसांची धावपळ उडाली.
सातारा सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी त्वरित हस्तक्षेप करत आंदोलकांचे समजूत घातली. त्यांनी संबंधित महिलेचे शेड पुन्हा बांधून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दिव्यांग बांधवांनी आंदोलन मागे घेतले.
आयुष विभागामार्फत योगग्राम सांबरवाडी येथे आरोग्य शिबीर संपन्न |
'अजिंक्यतारा'चे सभासद निकम यांचा 'ऊस भूषण' पुरस्काराने सन्मान |
स्वातंत्र्य लढ्यात सुभाषचंद्र बोस यांचे योगदान मोलाचे : डॉ. सुरेशराव जाधव |
ग्रहांची परेड पाहण्यासाठी बालचमूसह पालकांचा प्रतिसाद |
आसगावच्या माझी वसुंधरा अभियान, ग्रामस्थांच्या एकीने ठरले स्वाभिमान.... |
पाण्यासाठी नागरिकांचा जीवन प्राधिकरण कार्यालयात ठिय्या |
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा |
देगाव फाटा परीसरात 11 हजारांची घरफोडी |
संजय शेलार खून प्रकरणातील पाच संशयित जेरबंद |
बेकायदा बांधकामप्रकरणी आत्मदहनाचा इशारा |
जिल्हा बँकेत ९.०० टक्के व्याजदराची भांडवल पर्याप्तता दीर्घ मुदत ठेव योजना कार्यान्वीत : श्री. नितीन पाटील, अध्यक्ष |
न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रचला इतिहास |
भिरडाचीवाडी शाळेला ग्रामस्थांनी ठोकले टाळे |
पाण्यासाठी नागरिकांचा जीवन प्राधिकरण कार्यालयात ठिय्या |
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा |
देगाव फाटा परीसरात 11 हजारांची घरफोडी |
संजय शेलार खून प्रकरणातील पाच संशयित जेरबंद |
बेकायदा बांधकामप्रकरणी आत्मदहनाचा इशारा |
जिल्हा बँकेत ९.०० टक्के व्याजदराची भांडवल पर्याप्तता दीर्घ मुदत ठेव योजना कार्यान्वीत : श्री. नितीन पाटील, अध्यक्ष |
न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रचला इतिहास |
भिरडाचीवाडी शाळेला ग्रामस्थांनी ठोकले टाळे |
एसटी बसस्थानकांवर "हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान" राबविणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक |
संजय गांधी, इंदिरा गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी विशेष शिबीरांचे आयोजन |
महामार्गांवर महिलांसाठी तातडीने प्रसाधन गृहांची व्यवस्था करा |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
सातारा शहरातील तीन जुगार अड्ड्यांवर छापे |