कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवून संघटना मजबूत करावी

खा. नितीन काका पाटील : सातारा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न

by Team Satara Today | published on : 30 June 2025


सातारा : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पक्षवाढीसाठी संघटनात्मक बांधणीची गरज असल्याचे सूतोवाच केले आहे. त्यांचाच आदेश मानून राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते-पदाधिकारी यांनी तळागाळापर्यंत पक्षाची ध्येय-धोरणे पोहोचवावीत, असे प्रतिपादन खा. नितीन काका पाटील यांनी केले.

खासदार नितीन काका पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनात सातारा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, महिला कार्याध्यक्ष सीमाताई जाधव, कार्याध्यक्ष संजय देसाई, जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे, सातारा तालुका अध्यक्ष संदीप चव्हाण, किसनवीर कारखान्याचे संचालक सचिन जाधव, माजी उपाध्यक्ष अरविंद कदम, ज्येष्ठ नेते बबन बाबा साबळे, माजी कृषी सभापती किरण नाना साबळे, इंद्रजीत ढेंबरे, माजी तालुका अध्यक्ष शशिकांत वाईकर, युवक जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, प्रदेश युवक उपाध्यक्ष मनोज देशमुख, युवती प्रदेश संघटिका स्मिता देशमुख तसेच सातारा तालुक्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत सातारा तालुका अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सातारा तालुक्यामधील पक्षीय कामाचा आढावा दिला.

यावेळी मार्गदर्शन करताना खासदार नितीन काका पाटील म्हणाले, आपले नेते राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे विचार तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी सभासद नोंदणी अभियान राबवून पक्षाची ध्येय धोरणे सर्व कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचवून संघटना मजबूत करावी. पदाचा, नावाचा विचार न करता राष्ट्रवादी पक्ष हा जिल्हाभर पसरला पाहिजे, हेच ध्येय प्रत्येकाने अंगिकारले पाहिजे. तरुणांना डोळ्यासमोर ठेवून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पक्षाच्या माध्यमातून विविध संकल्प केले आहेत. ते तडीस नेण्याचे काम आपल्या सर्वांचे आहे. कार्यकर्ता हा केवळ कार्यकर्ताच न राहता त्याला बळ दिले तर तो नक्कीच पक्षाचा पदाधिकारी बनू शकतो. मात्र, त्या तळमळीनेच प्रत्येकाने राष्ट्रवादी पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

यावेळी बाळासाहेब सोळसकर, इंद्रजीत ढेंबरे, अरविंद कदम, सचिन जाधव आदींनी मार्गदर्शन केले.

बैठकीस संपतराव शिंदे, विक्रांत साबळे, विकास साबळे, युवराज पाटील, निलेश पाटील, संभाजी भाऊ कदम, मंगेश कदम, प्राध्यापक इंद्रजीत नलवडे, शिर्के भाऊ, माधव लोहार, सचिन इंगवले, धनाजी गायकवाड, गणेश चव्हाण, सोमनाथ देशमुख, नारायण पाटील, धैर्यशील साळुंके, मारुती जाधव, चंद्रकांत शेडगे, प्रदीप शिंगटे, ऋषिकेश चोरगे, निनाद चोरगे, संदीप जाधव, संतोष कदम, अरविंद शिंगटे आदींसह बहुसंख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यातील हृदय रुग्णांसाठी ना. शिवेंद्रसिंहराजे ठरले आरोग्यदूत
पुढील बातमी
शिष्यवृत्तीकरीता पात्र विद्यार्थ्यांकडून जबरदस्तीने फी वसूल केल्यास महाविद्यालयांवर गुन्हा

संबंधित बातम्या