महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टॅंकर, बस वाहतूक महासंघाचे सोमवारी चर्चासत्र

सातारा : महाराष्ट्राची शिखर संघटना असणाऱ्या महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस वाहतूक महासंघाचे एक दिवसीय चर्चासत्र सातारा येथे सोमवार दि,17 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. सातारा येथील महासैनिक भवन टीसीपीसी केंद्र, करंजे नाका येथे सकाळी दहा ते सहा या वेळा राज्यातील सर्व प्रतिनिधींचे हे एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी दिली.

या चर्चासत्रात सकाळच्या पहिल्या सत्रात सकाळी 11 ते 2 या वेळेत नोंदणी सातारा संघटने कडून मान्यवरांचे स्वागत दीप प्रज्वलन कैलासवासी मोहिंदर सिंग धुरा साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच सहकार्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. यावेळी महासंघाचे ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते व दुरून आलेल्या सर्व सहकाऱ्यांचा एक समूह फोटो काढला जाणार असून त्यानंतर आयोजित कार्यक्रमात प्रास्ताविक शिवाजीराव घोगले करणार आहेत. संघटना संस्थेची गरज व महत्त्व यावर बाळासाहेब कलशेट्टी आणि मान्यवर वक्ते यांचे मतप्रदर्शन होणार असून प्रकाश गवळी या सर्व कार्यक्रमात बाबत आपले मनोगत व्यक्त करणार आहेत.

दुसऱ्या सत्रात दुपारी तीन ते सहा या वेळेत संघटना बांधणी, त्याविषयी स्वरूप व रूपरेषा याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात येणार असून कार्यक्रमाचे आभार मानून या चर्चासत्राची सांगता होणार आहे. या एक दिवसाच्या सत्रास सर्व संघटना सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रकाश गवळी यांनी केले आहे.


मागील बातमी
माध्यमांचे स्वातंत्र्य हीच लोकशाही
पुढील बातमी
ग्रामीण भागाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर शासनाचा भर : पालकमंत्री शंभूराज देसाई

संबंधित बातम्या