भुईंज येथील महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत श्री शिवाजी उदय मंडळ विजयी

गेल्या 2 महिन्यात शिवाजी उदय मंडळास मिळालेले हे चौथे विजेतेपद

by Team Satara Today | published on : 05 October 2025


सातारा : भुईंज येथील आयोजित राज्यस्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचे सातारच्या श्री शिवाजी उदय मंडळास मिळाले.. 15 हजार रुपये व चषक असे या बक्षीसाचे स्वरूप होते द्वितीय क्रमांक बारामती स्पोर्ट्स अकॅडमीला मिळाले. 

शिवाजी उदय मंडळाने उपांत्य पूर्व फेरीत जावली स्पोर्ट्स वर तर उपांत्य फेरीत नाशिक च्या निफाड संघावर मात केली आणि अंतिम सामन्यात बारामती स्पोर्ट्स क्लब वर मात केली या स्पर्धेत 30 संघ सहभागी झाले होते. 

सदर संघात राष्ट्रीय खेळाडू गार्गी साखरे, श्रुती बेंद्रे, वैष्णवी इनामदार व राज्यस्तरीय खेळाडू, मनीषा गायकवाड, अनुष्का येवले, पूजा अवकीरकर, अनुजा दळवी, स्नेहल जाधव, तन्वी कदम, ईश्वरी केंजळे इत्यादी खेळाडू चा समावेश होता. या संघास राष्ट्रीय प्रशिक्षक शशिकांत यादव यांचे मार्गदर्शन लाभले.  

गेल्या 2 महिन्यात शिवाजी उदय मंडळास मिळालेले हे चौथे विजेतेपद आहे. शिवाजी उदय मंडळाचे अध्यक्ष गोपाळराव माने, सचिव शिवप्रसाद उथळे, खजिनदार सुरेश पाटील, नारायणदास दोशी, पांडुरंग महाडिक, मोहनराव निकम,अप्पा कुलकर्णी, निलेश महाडिक, विश्वास गोसावी, संजय मांडके, बंटीराजे भोसले, राष्ट्रीय प्रशिक्षक समीर थोरात, प्रणव लेवे, अजित जाधव, राजेंद्र गोसावी, मोहन घोरपडे,प्रवीण धुमाळ, विश्वास ताटे, विठ्ठल सुतार व शिवाजी उदय मंडळाचे सर्व सदस्य पदाधिकारी पालक यांनी अभिनंदन केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अभिजात मराठी"च्या वर्षपूर्तीनिमित्त संस्कृती कलामंच तर्फेभव्य निबंध स्पर्धा
पुढील बातमी
मराठी भाषेचे जतन, संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी : डॉ. माने

संबंधित बातम्या