सातारा : सुन्यती इंटरनॅशनल फौंडेशन व पिंकोलीन इंडिया फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 29 डिसेंबर रोजी सातारा येथे पिंक सुन्याथॉन रन मध्ये सातार्यातील तसेच सातारा बाहेरील सुमारे दीड हजार महिलांनी सहभागी होवून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
महिला सुरक्षा व महिलांशी संबंधित आरोग्य जनजागृतीसाठी सुन्यती इंटरनॅशनल फौंडेशन व पिंकोलीन इंडिया फौंडेशनच्या वतीने सातार्यात 29 डिसेंबर रोजी महिलांच्या पिंक सुन्याथॉन रन चे आयोजन करण्यात आले होते. 10, 5, 3 कि.मी. धावण्याची ही स्पर्धा होती. सातार्यातील छत्रपती शाहू क्रीडा संकुलामधून या रन ला चित्रपट अभिनेता गश्मीर महाजनी यांनी हिरवा झेंडा दाखवला. यानंतर सुमारे दीड हजारापेक्षा जास्त महिलांनी सातार्यातील रस्त्यावर आपली दौड लगावली. महिलांच्या या आगळ्यावेगळ्या पिंक रन मुळे सातार्यातील रस्ते अक्षरश: फुलून गेले होते.
ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सातारा हिल रनर्स चे डॉ. सुधीर पवार, रेस डायरेक्टर डॉ. जयंत शिंदे यांनी इव्हेंट प्रेसिडेन्ट, तर एनबी फिटनेस चे नितेश भोसले यांनी मॅन्टॉर म्हणून कामगिरी बजावली. इंटरनॅशनल मेडिटेशन एक्सपर्ट डॉ. राजेश सवेरा यांनी उपस्थित महिलांना मेडिटेशन देत मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तोरस्कर यांच्या व अभिनेते गश्मीर महाजन यांच्या हस्ते या स्पर्धेला फ्लॅग ऑफ म्हणजेच हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्पर्धेचे आयोजक जयश्री शेलार, ऑरफीड चे दिनेश काळे, क्लासिक ग्रुपच्या वैदेही बगाडे, इलिट हॉटेलच्या संचालिका तन्वी मोरे, ऍबेकस चे किरण पाटील, चैताली भोसले, लिरास च्या मृणाल कोळेकर, मॉनजिनीज केक शॉप च्या संचालिका तेजश्री जाधव, भाग्यश्री पवार, डॉ. भाग्यश्री शिंदे, आपला आवाज आपली सखी च्या संगीता तरडे यांनी विशेष परिश्रम घेतले.