सातारा : मारहाण प्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास राजवाडा परिसरात सचिन मोहन गायकवाड रा. मतकर कॉलनी, सातारा यांना चाकू व दगडाने मारहाण केल्याप्रकरणी अक्षय जगताप (पूर्ण नाव माहित नाही) रा. रविवार पेठ, सातारा याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार माने करीत आहेत.