सातारा : ऊस तोडीच्या आमिषाने सुमारे साडेपाच लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 ऑगस्ट 2024 रोजी पवन प्रभाकर राठोड रा. अथवर्ण पिंपरी, ता. जि. बीड याने ऊस तोडणी साठी माणसे देवून ट्रॅक्टर मार्फत ऊस नेण्याचे आश्वासन देऊन शरद महादेव जाधव रा. सोनगाव तर्फ सातारा यांच्याकडून 5 लाख 60 हजार रुपये घेतले. यानंतर त्याने कोणतीही माणसे वा ट्रॅक्टर न पाठवता शरद जाधव यांची फसवणूक केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.
ऊस तोडीच्या आमिषाने सुमारे साडेपाच लाखांची फसवणूक
by Team Satara Today | published on : 06 February 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
गळफास घेऊन सातारा शहरातील अल्पवयीन मुलाची आत्महत्या
June 17, 2026
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा
June 17, 2026
प्रेमलाताई स्मृती राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेचे आयोजन
June 17, 2026