सातारा : सातारा शहर परिसरातील करंजेत घरे फोडून सहा लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास, तर 2 दुचाकींचीही चोरी करण्यात आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी नीलम नागेशनाथ मोहिते (मूळ रा. भाडळे, ता. कोरेगाव, सध्या रा. सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार, दि. 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान घरफोडी आणि चोरीचा हा प्रकार करंजेतील सप्तर्षी प्राईड येथे घडला. अज्ञात चोरट्यांनी घरफोडीत रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आणि दोन दुचाकी चोरून नेल्या आहेत. करंजे येथील एकूण तीन घरांत चोरी करण्यात आली. दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून ही चोरी झाली आहे. तसेच परिसरातून दोन दुचाकीही चोरून नेण्यात आल्या आहेत. या घरफोडी व चोरीत अज्ञात चोरट्यांनी एकूण 6 लाख 22 हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ढेरे करीत आहेत.
करंजेत घरफोडीसह चोरी
सुमारे साडेसहा लाखांचा मुद्देमाल लंपास
by Team Satara Today | published on : 28 February 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी शिवथर येथील दोन जणांवर गुन्हा
August 16, 2026
जिल्ह्यातून हद्दपारआदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
August 16, 2026
पोवई नाका परिसरातील हॉटेल वसंत भोजनालयावर त्वरित कारवाई करावी
August 16, 2026