सातारा : रघुनाथपुरा पेठ,एकता कॉलनी करंजे येथे राहणारे संजय दत्तात्रय तिताडे (वय ५९,रा. करंजे) यांच्या घरासमोर लावलेली गाडी काढण्यास सांगितल्याने दोन जणांनी शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रफिक गफूर शेख आणि सुलेमान तहसीलदार( दोन्ही राहणार करंजी एकता कॉलनी सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे.ही घटना दिनांक ३ मार्च रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास घडली आहे.
तिताडे यांनी घराचे काम चालू असून तुमच्या गाडीवर काही पडले तर तुमच्या गाडीचे नुकसान होईल, त्यामुळे दारासमोर लावलेली गाडी तुमच्या जागेत लावा असे सांगताच दोघांनी चिडून जाऊन तिताडे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तिताडे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दि १६ मार्च रोजी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक साबळे अधिक तपास करत आहेत.