एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले कामाचे कौतुक

by Team Satara Today | published on : 16 August 2026


मुंबई : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक करीत ते लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे म्हटले आहे. तर शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, ही शिवसैनिकांची इच्छा असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरून वक्तव्ये सुरु केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

शिंदे हे जनतेच्या अडीअडचणी सोडवितात, आपत्कालीन परिस्थितीत धावून जातात. त्यांचे काम जनतेला माहीत आहे, असे जाधव यांनी म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्याला सरनाईक यांनी पाठिंबा दिला आहे. 

...तर शिवसेना दावा करणार

सध्याच्या परिस्थितीत भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने मुख्यमंत्रिपद भाजपकडे आहे. भविष्यात शिवसेनेचे अधिक आमदार आणि खासदार निवडून आले, तर मुख्यमंत्रिपदावर शिवसेना दावा करेल, अशी भूमिकाही सरनाईक यांनी मांडली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तेव्हा माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं - पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट
पुढील बातमी
उद्योगमंत्री उदय सामंत यांची चाकणमधील उद्योजकांच्या प्रतिनिधींशी चर्चा; १७-१८ किमी रस्त्यांना नव्याने मंजुरी, १०० टक्के न्याय मिळेपर्यंत प्रशासन काम करणार

संबंधित बातम्या