वाढे फाटा ते लिंब सर्व्हिस रस्त्यावर घरफोडीची हत्यारे बाळनारया एकावर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 16 May 2026


सातारा : तालुक्यात घरफोडीची हत्यारे बाळगून संशयास्पद हालचाल करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास वाढे फाटा ते लिंब जाणाऱ्या सर्व्हिस रस्त्याच्या बाजूला संबंधित इसम फिरोज शमीउल्ला सिद्दिकी आपले अस्तित्व लपवून फिरत असल्याचे आढळले. त्यावेळी त्याच्या ताब्यात घरफोडी करण्यासाठी वापरली जाणारी हत्यारे मिळून आली.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संदीप पांडव यांनी सरकारतर्फे फिर्याद देत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. फिरोज शमीउल्ला सिद्दिकी (वय ३०, रा. लिंब फाटा, ता. जि. सातारा, मूळ रा. उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

या घटनेचा पुढील तपास म.पो.हवा. गायकवाड करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध शाहूपुरी पोलिसांत गुन्हा
पुढील बातमी
करंजे नाका परिसरातील २० वर्षीय तरुणी बेपत्ता; शाहूपुरी पोलिसांत नोंद

संबंधित बातम्या