सातारा : गहुंजे, तालुका मावळ येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर महाराष्ट्र प्रीमियर लीग चा तसेच महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचे आयोजन येत्या 4 जून पासून सुरू होत आहे. याशिवाय सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनला 50 वर्षे पूर्ण होत आहे या निमित्ताने सातारा तालुक्यात कुशी व कोडोली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची दोन क्रिकेट मैदाने विकसित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी दिली. यावेळी संघटनेचे सचिव कमलेश पिसाळ, सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निशांत गवळी, सचिव इर्शाद बागवान, भालचंद्र निकम तसेच सातारा वॉरियर्स संघाचे फ्रँचाईजी ओनर ईशान उत्पल व केके गडोख इत्यादी यावेळी उपस्थित होते. रोहित पवार पुढे म्हणाले, 4 जून पासून सुरू होणार्या या सामन्यांमध्ये एकूण दहा संघांचा सहभाग आहे. यामध्ये सहा संघ हे पुरुषांचे, तर चार संघ हे महिलांचे आहेत. महिला संघांचे सामने 5 जून पासून स्वतंत्रपणे भरवले जाणार आहेत. याशिवाय सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारा सातारा वॉरियर हा संघ यंदाच्या एम पी एल स्पर्धेत सहभाग घेत आहे. गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनुभव देणारे 28 सीसीटीव्ही कॅमेरे, डीआरएस सिस्टीम याशिवाय स्टेडियमच्या परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा दिल्या जाणार आहेत. सातारकरांनी या सामन्यांचा अवश्य आनंद घ्यावा. हे सामने पूर्णपणे मोफत असणार आहेत. या सामन्यांचे थेट प्रक्षेपण दूरचित्रवाणीवर केले जाणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये क्रिकेटचे प्रचंड पोटेन्शिअल आहे. त्याला आयपीएल, त्यानंतर राज्य पातळी आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर गुणवत्ता देण्यासाठी या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक संघाला दहा सामने खेळायला मिळणार आहेत. क्रिकेट संघांना जास्तीत जास्त सराव व्हावेत या दृष्टीने हे नियोजन आहे. सातारा शहरासह तालुक्यातील कुशी या ठिकाणी 30 एकर जागेसंदर्भात बोलणे सुरू आहे. याशिवाय सावकार मेडिकल कॉलेजच्या परिसरातील मोकळ्या जागेवर क्रिकेटचे ग्राउंड विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू आहेत. सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन ला या वर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. सातारा जिल्ह्याचे प्रगल्भ राजकीय नेतृत्व आणि चार कॅबिनेट मंत्रीपदे या माध्यमातून या दोन्ही मैदानाच्या विकासासाठी 50 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. खेळ भावनेसाठी राजकीय इच्छाशक्ती तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सहकार्य यामुळे काही गोष्टी ठरविल्यास दोन्ही स्टेडियम उभे राहण्यास काहीही हरकत नाही, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यासंदर्भात एका मैदानाचा प्रस्ताव दिलेला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या धनिनीची बाग येथील पिछाडीला असणार्या मोकळ्या जागेच्या मैदानासंदर्भातही चर्चा सुरू आहे जर ते निश्चित झाले तर तेथे बहुजन समाजातील मुला-मुलींसाठी स्वतंत्र होस्टेलही बांधण्यात आले पाहिजे, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली. यावेळी सातारा वॉरिअर्सच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले.
गहुंजे येथील स्टेडियमवर रंगणार महाराष्ट्र प्रीमियर लीगचा थरार
सातारा वॉरियर चा सहभाग, 4 जून पासून सामन्यांची सुरुवात : एमसीए चे अध्यक्ष रोहित पवार यांची माहिती
by Team Satara Today | published on : 19 May 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
कराडमधील ५५ कोटींचे एमडी ड्रग्स प्रकरण
January 26, 2026
प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन
January 26, 2026
लातूर अर्बन को-ऑप. बँकेच्या कराड, सातारा शाखांचा आजपासून शुभारंभ
January 25, 2026
कोंडवे येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या
January 25, 2026
विवाहितेच्या छळप्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल
January 24, 2026