सातारा पोलीस मुख्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम

by Team Satara Today | published on : 11 September 2025


सातारा, दि. ११ : वर्ये (ता. सातारा) येथील कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च (केबीपीआयएमएसआर) आणि क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' सातारा पोलीस मुख्यालय येथे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
केबीपीआयएमएसआरचे विद्यार्थी श्रावणी आमणेकर आणि श्रावणी माने या दोघींनी सायबर सुरक्षेबद्दल काही पदाधिकाऱ्यांना आणि काही पोलिस कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली. यावेळीसायबर सुरक्षेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आणि उपस्थितांना सायबर सुरक्षा प्रतिज्ञा दिली. या कार्यक्रमात सायबर सुरक्षा माहितीपत्रकांचे वितरणही करण्यात आले.या उपक्रमामुळे पोलिस कर्मचाऱ्यांनमधे अजून जास्त  सायबर सुरक्षेबाबत जागरूकता वाढली असून, भविष्यातील सायबर धोके ओळखण्यास आणि त्यांना तोंड देण्यास मदत होईल. उपक्रमासाठी संस्थेचे संचालक डॉ. बी. एस. सावंत, संगणक विभागप्रमुख डॉ. आर. डी. कुंभार आणि पी. ए. लोखंडे यांच्या सहकायनि हा उपक्रम सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राजमाता जिजाऊंच्या स्मारकाला मिळणार झळाळी
पुढील बातमी
नेपाळमधून भारतीयांना रेस्क्यू करणार

संबंधित बातम्या