जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सातारा तालुक्यात २२० नामनिर्देशन पत्रांची विक्री

by Team Satara Today | published on : 17 January 2026


सातारा :  सातारा तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी इच्छुक उमेदवारांचा उत्साह वाढलेला दिसून येत आहे. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र वितरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी एकूण ८७ नामनिर्देशन पत्रे उपलब्ध करून देण्यात आली, तर दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी १३३ नामनिर्देशन पत्रे वितरित करण्यात आली आहेत. या दोन दिवसांत एकूण २२० नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली आहे.

नामनिर्देशन प्रक्रियेला मिळणारा प्रतिसाद पाहता सातारा तालुक्यातील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत असून विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्यावतीने 200 उमेदवारांच्या मुलाखती; मुलाखत देण्यासाठी इच्छुक व त्यांच्या समर्थकांनी पक्ष कार्यालयात मोठी गर्दी
पुढील बातमी
१ नोव्हेंबर २०२५ रोजी साताऱ्यात जखमी अवस्थेत आढळलेल्या अनोळखी महिलेचा मृत्यू

संबंधित बातम्या