मुलीचा विनयभंग प्रकरणातील डॉक्टरचा रुग्णालय परवाना रद्द करा

उबाठा गटाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

by Team Satara Today | published on : 21 July 2025


सातारा : सदर बाजार सातारा येथे ओपीडी मध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरचा व्यवसाय परवाना तात्काळ रद्द करावा आणि त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.शिवसेना सातारा शहर संघटक प्रणव सावंत यांच्या नेतृत्वाखाली रवींद्र भणगे, श्रीकांत पवार, मिलिंद कांबळे, आकाश धोंडे, आशुतोष पारंगे, रविदास बडदरे, दादासाहेब राजश्री, प्रशांत इंगळे, एडवोकेट शिवेंद्र ताटे, अनिल गुजर, श्रीकांत गडांकुश, अमित नाईक, आकाश पवार इत्यादी यावेळी उपस्थित होते.या निवेदनात नमूद आहे की, इंजेक्शनद्वारे अल्पवयीन मुलीला धमकी देऊन तिचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरवर कठोर कारवाई केली जावी. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. मुलीचे अश्लील फोटो काढून तिचा विनयभंग करण्यात आला. तसेच मारून टाकण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार वेदनादायक आहे. डॉक्टर हा माणसातला देव असे आपण संबोधतो. या डॉक्टरने डॉक्टरी पेशाला काळीमा फासला आहे. त्या डॉक्टरला ताब्यात घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी आणि डॉक्टरी पेशाचा त्याचा परवाना रद्द करावा. अन्यथा येत्या दहा दिवसात शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राजवाडा परिसरात उभे राहणार सुसज्ज बहुमजली पार्किंग
पुढील बातमी
खटाव पंचायत समिती मधील विस्तार अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

संबंधित बातम्या