सातारा : सातारा शहर परिसरात अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरीचा धडाका करत तीन दुचाकी चोरुन नेल्याबाबतच्या तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पहिली तक्रार संतोष लक्ष्मण झोरे (वय 22, रा. समर्थ मंदीर परिसर, सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. एमआयडीसी परिसरातून त्यांची दुचाकी क्रमांक एमएच 50 डब्ल्यू 3789 ही चोरी झाली.
दुसरी तक्रार बापू हरिदास शिंदे (वय 21, रा. गोडोली) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. 3 मार्च रोजी एमएच 45 एव्ही 1725 या क्रमांकाची दुचाकी अज्ञाताने चोरुन नेली.
तिसरी तक्रार जितेंद्र दिनकर धुमाळ (वय 53, रा. एमआयडीसी परिसर, सातारा) यांची एमएच 11 झेड 2619 या क्रमांकाची दुचाकी एमआयडीसी परिसरातून अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे.