अहिल्यानगर : अहिल्यानगर येथे झालेल्या ‘महाराष्ट्र केसरी २०२५’ च्या स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ व महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम लढत झाली. अंतिम सामन्यात पुण्याच्या पृथ्वीराज मोहळने २-१ ने महेंद्र गायकवाडचा पराभव करत महाराष्ट्र केसरी २०२५ चा विजेता ठरला आहे.
स्पर्धेच्या विजयानंतर महाराष्ट्र केसरीचे विजेता पृथ्वीराज मोहळला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते चांदीची गदा देऊन सन्मान करण्यात आला आहे.
गादी विभागात झालेल्या अंतिम लढतीत पृथ्वीराजकडून पराभव झाल्यावर पहिलवान शिवराज राक्षे आक्रमक झाला. त्याने थेट पंचांशी वाद घातला व लात मारली होती. या प्रकरणात आता शिवराज राक्षे याने आपला रिव्हूय दाखविण्यात यावा आणि माझे खांदे आणि पाठ टेकलेली असेल तर आपण स्वत:च कूस्ती सोडून बाहेर पडतो असे म्हटले होते.
दरम्यान, सामन्यातील पंचांनी शिवराज राक्षेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.