सिव्हिल परिसरात अज्ञाताकडून २० हजार रुपये किमतीच्या मोबाईल चोरीस

by Team Satara Today | published on : 18 March 2026


सातारा  : सातारा सिव्हिल हॉस्पिटल मधील मोकळ्या जागेत मोहम्मद राहील तसबीर मियासाहब (वय २९, रा. शिरवळ ता. खंडाळा  मूळ रा.उत्तर प्रदेश) हे दि. १५ रोजी रात्री ११ वाजता झोपले असताना अज्ञात व्यक्तीने २० हजार रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल त्यांच्या खिशातून चोरी केला. पहाटे ३ वाजता जाग आली तेव्हा मोबाईल जवळ आढळून आला नाही. मोबाईल चोरी झाल्याने याची फिर्याद शहर पोलिसांत करण्यात आली.घटनेचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल पवार करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात 'पोस्को' दाखल
पुढील बातमी
एकता कॉलनी येथे तारेचे कंपाउंड करण्यास मज्जाव; दोघाजणांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

संबंधित बातम्या