खुटाळे इंजिनिअरींग प्रा. लि. व सिनर्जी इंजिनिअर्स अँड पावडर कोटर्स सातारा यांचा संयुक्तपणे सुरक्षा दिन-सप्ताह

by Team Satara Today | published on : 13 March 2025


सातारा : ४ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता सायरन वाजता क्षणीच कंपनीचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक शिरीष खुटाळे व संचालिका सौ. शुभांगी खुटाळे यांनी सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ झाल्याचे जाहीर केले. 

या निमित्त ७ मार्च रोजी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे माजी सहसंचालक सुरेश पाटील, मॅन्युफ़ॅक्चरर्स असोसिएशन ऑफ साताराचे अध्यक्ष संजोग मोहिते व सचिव दिपक पाटील हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. शिरीष खुटाळे यांनी पाहुण्याचे स्वागत केल्या नंतर प्रमुख पाहुण्यांनी सर्व कामगार कर्मचारी बंधू भगिनींना सुरक्षा शपथ दिली. सुरक्षा सप्ताहात आयोजित केलेल्या औद्योगिक सुरक्षा,‘असुरक्षित स्थिती व असुरक्षित कृति’ दाखवा, पर्यावरण रक्षण इत्यादी विषया वरील भित्ती चित्र, घोष वाक्य स्पर्धा प्रदर्शना बद्दल महत्व विषद करून घेण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती दिली. तसेच आस्थापनातील सर्व कामगार कर्मचाऱ्यांना सुरक्षा बाबतीत अधिक जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले.  

संजोग मोहितें व दिपक पाटील यांनी औद्योगिक कामगारांनी सुरक्षित काम करण्यचे फायदे व तोटे विषद करून मास तर्फे करीत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली अन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या,

प्रमुख पाहुणे श्री पाटील साहेबांनी विविध औद्योगिक आस्थापनात जसे प्रेस शॉप, केमिकल व इतर उद्योगात होणारे अपघात, लागणाऱ्या आगी ,होणारी जीवित व वित्त हानी व सुरक्षितता उपकरणांचा वापर करण्याचे आवाहन केले. शून्य हानी ध्येय “Our Aim - Zero Harm” सांगून त्यांनी महिला दिना निमित्त कंपनीतील महिला कामगारांना शुभेच्छा दिल्या. 

सौ शुभांगी खुटाळे यांनी महिला दिना निमित्त लता भगवान करे या एका वयोवृद्ध महिलेची प्रेरणादायी गोष्ट सांगून कंपनीतील महिलाच्या गुणांचे कौतुक करून त्यांच्या साठी कंपनीत करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच कंपनीत महिलांना POSH कायद्या अंतर्गत गठीत केलेली समिती व त्या अंतर्गत महिलांना देण्यात येणाऱ्या संरक्षणा बद्दल माहिती दिली. या निमित्त पाहुण्यांच्या हस्ते महिलांना भेट देण्यात आली. 

कंपनीच्या एच आर विभागाचे अधिकारी सुळके, पानस्कर, आदेश अंधारे,  कुलदीप रिटे व सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन व आभार प्रदर्शन केले. प्रेस शॉप प्रमुख महेद्र पवारांनी सर्वांना सुरक्षा शपथ दिली. या वेळी कंपनीचे वरीष्ठ अधिकारी राजेंद्र बोराटे, प्रशांत माने, मंगेश संकपाळ, प्रशांत जाधव, प्रकाश सावंत व इतर अधिकार ,कर्मचारी व कामगार उपस्थित होते.       


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
धरणग्रस्तांकडून कराडमध्ये ठिय्या आंदोलन
पुढील बातमी
नारळपाणी तुम्हाला वाटते तितके आरोग्यदायी आहे का?

संबंधित बातम्या