सातारा : शनिवारी सातार्यात मिरवणूकवेळी डीजे चालकांनी मोठया आवाजात गाणी लावून तसेच पोलिसांनी सांगूनही डीजेची वाहने पुढे नेली नाहीत, यावरुन वाहतुकीस अडथळ्यासह आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 7 डीजे चालकांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहुपुरीचे पोलीस शुभम चव्हाण यांनी डीजे चालक अभिषेक रविंद्र चव्हाण (रा.म्हसवे ता.जावली) याच्या विरुद्ध तक्रार दिली आहे. मतकर कॉलनी, सातारा येथे कॉलनी येथे ही कारवाई केली आहे. दुसरी तक्रार पोलीस शुभम चव्हाण यांनी डीजे चालक सुरज दिनकर पवार (रा.रविवार पेठ, सातारा) याच्या विरुद्ध दिली आहे. सातार्यातील बुधवार पेठ येथे मिरवणूकवेळी पोलिसांनी ही कारवाई केली. तिसरी तक्रार पोलीस दिपक पोळ यांनी डीजे चालक अरिफ सलीम मुलाणी (वय 30, रा. कार्वे ता.कराड) याच्या विरुद्ध तक्रार दिली आहे. पोलिसांनी ही कारवाई शनिवार चौक ते देवी चौक या दरम्यान केली आहे. चौथी तक्रार पोलीस दिपक पोळ यांनी डीजे चालक रोहित तानाजी बाचल (रा.सैदापूर ता.सातारा) व रोहन उमेश गोरे (वय 22, रा. सैदापूर ता.सातारा) या दोघांविरुद्ध तक्रार दिली आहे. गोलबाग सर्कल ते देवी चौक यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली.
सातारा शहरचे पोलीस राजेंद्र भोंडवे यांनी चिंतामणी साउंडच्या सुधीर सपकाळ (रा.चिंचणेर वंदन ता.सातारा) याच्या विरुद्ध तक्रार दिली आहे. प्रतापसिंहगर येथे टेंम्पोमध्ये साउंड सिस्टिम भरुन मोठ्या आवाजाने गाणी लावली होती. दुसरी तक्रार पोलीस विश्वनाथ मेचकर यांनी दिली आहे. शाहूनगरवासी मित्र मंडळाने त्यांच्या मंडळासमोर साम्राज्य साउंड सिस्टिम लावली होती. विवेक सुनील भोसले (रा.कोळकी ता.फलटण) याच्या विरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. शाहू चौकात पोलिसांनी ही कारवाई केली. तिसरी तक्रार पोलीस गणेेश जाधव यांनी पाटील सांउड सिस्टिमचा प्रतीक सुनील माने (डबेवाडी ता.सातारा) याच्या विरुद्ध तक्रार दिली आहे. शाहू चौकातच कर्णकर्कश आवाजात डीजे सिस्टिम लावला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
शनिवारी सातार्यातील मिरवणूक प्रकरणी शहर पोलिसांनी तीन डीजे चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यापाठोपाठ शाहूपुरी पोलिसांनीही कारवाईचा बडगा उगारला.