बाल विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणे काळाची गरज

इम्रान मोमीन; रंग प्रवाह नाट्य संस्थेच्यावतीने कात्रेवाडा शाळेत स्नेहभोजन

by Team Satara Today | published on : 21 April 2025


सातारा : रंग प्रवाह नाट्य संस्था, कलर्स फाउंडेशन, निर्मिती सोशल ग्रुप यांच्यावतीने गोर- गरीब विद्यार्थ्यांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात. यापुढील काळात या विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इम्रान मोमीन यांनी स्पष्ट केले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेच्यावतीने नगरपालिका शाळा क्रमांक ६ कात्रेवाडा मंगळवार पेठ, सातारा या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे तसेच शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मोमीन यांच्यासह संस्थेचे मार्गदर्शक अमर मोकाशी, राजू गोरे, मनीष काशीद, प्रथमेश देवकर, अख्तर शेख, ऋषिकेश गंगावणे, इरफान शेख, कुमार अवघडे, नितीन सूर्यवंशी, सादिक आंबेकरी, इर्शाद बागवान, सागर जाधवराव आदी उपस्थित होते. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवले जात असून आगामी काळातही गोर- गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी सर्वोतोपरी साहाय्य करण्यात येणार असल्याचे मोमीन याप्रसंगी म्हणाले. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नॅशनल हेराल्ड केस संदर्भात काँग्रेस घेणार ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा
पुढील बातमी
अल्प व्याजदराने त्वरित वाहनतारण कर्ज उपलब्ध : अमोल मोहिते

संबंधित बातम्या