सातारा : आर्थिक फसवणूक प्रकरणी एका महिलेविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील सुमारे 12 महिलांना महिला बचत गटात गुंतवणूक करण्यास उद्युक्त करून त्यांची सुमारे साडेपाच लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहरातील एका महिलेविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सावंत करीत आहेत.