09:03pm | Dec 27, 2024 |
सातारा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेली वक्तव्य निंदणीय आहेत. त्यामुळे राष्ट्रपती यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना माघारी बोलवावे, अशी मागणी सातार्यात आंबेडकरवादी संघटनांनी करत मोर्चा काढला. या मोर्चामध्ये शेकडो संघटना सदस्य सहभागी झाले होते. अमित शहा यांचा निषेध असो, संविधानाचा विजय असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
आंबेडकरवादी चळवळीचे चंद्रकांत खंडाईत तसेच त्यांचे सहकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. शाहू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला दुपारी बारा वाजता सुरुवात झाली. या मोर्चामध्ये सहभागी सदस्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. आंबेडकरवादी संघटनांचे सदस्य राजपथावरून मोर्चा काढत मोती चौकामध्ये आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे येथील वाहतूक एकेरी ठेवण्यात आली होती. मोर्चा मोती चौकातून पुन्हा कर्मवीर पथावरून पोवई नाका व तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.
जोपर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपल्या वक्तव्याबाबत माफी मागत नाहीत तोपर्यंत दलित चळवळीचे कार्यकर्ते हे आंदोलन करतच राहणार. अमित शहा यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अन्यथा राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करून त्यांना माघारी बोलवावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल त्यांनी केलेले निंदनीय वक्तव्य माफ करण्यासारखे नाही. त्यांनी तातडीने पदत्याग करावा, अशी आग्रही मागणी आंबेडकरवादी चळवळीच्या वतीने करण्यात आली.
उत्तेकर नगर मध्ये 55 हजारांची घरफोडी |
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
विलासपूर येथे सुमारे पावणे दोन लाखांची घरफोडी |
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
लग्नाच्या आमिषाने युवतीवर अत्याचार |
रहदारीस अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
आयेशा ताहेर मणेर हिचे सीए परीक्षेत यश |
सरपंच परिषदेचे रास्ता रोको नंतर धरणे आंदोलन |
डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी |
डॉ. बाबासाहेब आंबेडकरवादी संघटनांचा सातारा शहरात मोर्चा |
बांधकाम विभागाने कामाच्या दर्जाबाबत तडजोड करू नये |
संगममाहुली येथील राजघाटाचे पुर्ननिर्माण करणार : मंत्री शिवेंद्रसिंहराजे |
तोतया ‘आयपीएस’चा आणखी सोळा जणांना गंडा |
महाबळेश्वरसह जिल्ह्यातील मधपाळ संकटात |
देशातील ग्रामीण भागात नवीन बहुउददेशीय सहकारी संस्था उघडण्याचा निर्णय कौतुकास्पद |
रहदारीस अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
आयेशा ताहेर मणेर हिचे सीए परीक्षेत यश |
सरपंच परिषदेचे रास्ता रोको नंतर धरणे आंदोलन |
डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी |
डॉ. बाबासाहेब आंबेडकरवादी संघटनांचा सातारा शहरात मोर्चा |
बांधकाम विभागाने कामाच्या दर्जाबाबत तडजोड करू नये |
संगममाहुली येथील राजघाटाचे पुर्ननिर्माण करणार : मंत्री शिवेंद्रसिंहराजे |
तोतया ‘आयपीएस’चा आणखी सोळा जणांना गंडा |
महाबळेश्वरसह जिल्ह्यातील मधपाळ संकटात |
देशातील ग्रामीण भागात नवीन बहुउददेशीय सहकारी संस्था उघडण्याचा निर्णय कौतुकास्पद |
रोटरी क्लबतर्फे ’राष्ट्र निर्माता’ पुरस्काराने शिक्षकांच्या गौरव |
शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार |
कोयना हेळवाक वनपरिक्षेत्रातील सर्व पर्यटनस्थळे 5 दिवस बंद |
मंत्री भरत गोगावले यांचा गड, किल्ला स्वच्छता मोहिमेस पाठिंबा |
युवती बेपत्ता |