एकास जखमी करून गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी बस चालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 24 May 2025


सातारा : अपघातात एकास जखमी करून त्याच्या गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी बस चालका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 रोजी सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास रामनगर, ता. सातारा गावच्या हद्दीत मोळाचा ओढा, सातारा ते विठ्ठल मंगलम कार्यालय जाणाऱ्या रस्त्यावर अर्जुन निशांत गवळी रा. सदर बाजार सातारा हे त्यांची कार क्र. एमएच 11 सीयु 0100 घेऊन पुणे बाजूकडे जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या सातारा आगाराच्या स्वारगेट-सातारा एसटी बस क्र. एमएच 14 केए 8590 चे चालक सतीश शिवाजी सकुंडे रा. आंबवडे, ता. कोरेगाव, जि. सातारा यांनी त्यांच्या ताब्यातील बस ही गवळी यांच्या गाडीला धडकवली. तसेच अपघातानंतर बस चालक गवळी हे जखमी असताना त्यांना कोणतीही वैद्यकीय मदत न करता तसेच अपघाताबाबत पोलिसांना माहिती न देता पळून गेला आहे. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कंटेनरखाली सापडून मुंढेतील दुचाकीस्वार ठार
पुढील बातमी
सातारा औ‌द्योगिक विकास कार्यालय महाराष्ट्रात प्रथम

संबंधित बातम्या