जेवणासाठी घरी आलेल्या दांम्पत्याकडून दागिन्यांची चोरी

by Team Satara Today | published on : 10 March 2025


सातारा : जेवणासाठी घरी आलेल्या दांम्पत्याने घर मालकिणीचे लक्ष चुकवून बेडरूमच्या कपाटातील सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना ओंकार सोसायटी शाहूपुरी येथे घडली आहे. ही घटना दिनांक 8 फेब्रुवारी सायंकाळी सात ते साडेनऊच्या दरम्यान घडली.

या प्रकरणी नम्रता युवराज अडसूळ वय 38 यांनी फिर्याद दिली आहे. मोहम्मद उर्फ गुड्डू फिरासत अन्सारी व तमन्ना मोहम्मद अन्सारी दोघे राहणार साबरी मस्जिद समोर राज्य उत्तर प्रदेश सध्या राहणार मोळाचा ओढा, सातारा यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी अडसूळ यांनी अन्सारी दांपत्याला घरी जेवायला बोलवले होते. फिर्यादी किचनमध्ये कामात व्यस्त असताना फिर्यादीचे लक्ष चुकवून बेडरूम मधील लॉक न लावलेल्या लोखंडी गोदरेजच्या कपाटातून सोन्याचे दागिने अंगठी, गंठण व रोख रक्कम असा 2 लाख 36 हजार 900 रुपये किंमतीचा मुद्देमाल दांपत्याने लांबवला. पोलीस हवालदार घोडके अधिक तपास करत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा
पुढील बातमी
शाहूनगर मध्ये महिलेचे अडीच तोळ्याचे गंठण लांबवले

संबंधित बातम्या