सातारा : श्रीमंत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पाटण भेटीतून पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यातील श्रीमंत राजेभोसले व श्रीमंत सरदार पाटणकर घराण्याचा जिव्हाळा संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राला अनुभवायला मिळाला. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा वाढदिवस तसेच त्यांचे नातू व सत्यजितसिंह पाटणकर यांचे सुपुत्र अर्जुनसिंह व सौ. वैभवीदेवी यांचा विवाह या ही दोन प्रमुख कारणांकारती ही राजघराण्यांची सदिच्छा भेट झाली.
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नुकतीच पाटण येथे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या शिक्का मॅन्शन या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. भेटीचे कारण म्हणजे नुकताच विक्रमसिंह पाटणकर यांचा ८१ वा वाढदिवस तर त्यांचे नातू व सत्यजितसिंह पाटणकर यांचे सुपुत्र अर्जुनसिंह व श्रीमंत हर्षनिल महागांवकर यांच्या सुकन्या सौ. वैभवीदेवी यांचा विवाह संपन्न झाला हा होता. या दोन्ही सोहळ्यास श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे उपस्थित राहणार होते मात्र न टाळता येणा-या कार्यक्रमामुळे ते बाहेरगावी असल्याने त्यावेळी ते उपस्थित राहू शकले नव्हते म्हणूनच त्यांनी आज सदिच्छा भेट देत दोन राजघराण्यांचे ऋणानुबंध व हितसंबंध जपले.
मुळातच इतिहासापासून युगपरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमंत सरदार पाटणकर घराण्यांचे ऋणानुबंध व नातेसंबंध सर्वज्ञात आहेत. राजमाता श्रीमंत स्व.. सुमित्रा राजे भोसले, स्व..प्रतापसिंह राजे भोसले,,स्व.. अभयसिंह राजे भोसले, स्व.. शिवाजीराजे भोसले यांचेसह खासदार श्रीमंत छत्रपती उदयनमहाराज भोसले, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती ना. शिवेंद्रसिंह राजे भोसले या छत्रपती घराण्यातील महनीय व्यक्तीं आणि सरदार पाटणकर घराण्यांच्या पिढ्यांनी देखील हेच ऋणानुबंध व नातेसंबंध कायम जपले आहेत. याचीच झलक या सदिच्छा भेटीतून अनुभवायला मिळाली.. पराक्रम, संस्कार आणि जनहित कायमच जपणारी ही दोन घराणी सुखदुःखातही एकमेकांशी घट्ट असतात. सामाजिक, धार्मिक ऋणानुबंध जपताना या घराण्यांनी राजकारणा पलीकडे जाऊनही अनेकदा आपले नाते व हितसंबंध जपल्याचे सर्वज्ञात आहे. रामदास स्वामींनी दिलेली प्रभू श्रीरामाची मूर्ती यातूनच पाटणकर यांच्या वाड्यात साकारलेले श्रीराम मंदिर याचा देखील कायमच उल्लेख केला जातो. या दोन्ही घराण्यांशी निगडित पराक्रम, धार्मिक, सांस्कृतिक परंपरा याचा एकदिलाने केला जाणारा प्रयत्न यासाठी छत्रपती व सरदार पाटणकर घराण्याचे हेच ऋणानुबंध वेळोवेळी पहायला मिळाले आहेत.
यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचे आशीर्वाद घेतले व नव वधूवरांना भावी जीवनासाठी आपल्या खास शैलीत शुभेच्छाही दिल्या. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर यांच्यामध्ये तब्बल अडीच ते तीन तास विविध विषयांवर सखोल चर्चा झाली.
यावेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, सौ. यशस्विनीदेवी पाटणकर, श्रीमंत हर्षनिल महागांवकर, युवा उद्योजक याज्ञसेन पाटणकर, अर्जुनसिंह पाटणकर, सौ, वैभवीदेवी पाटणकर, माजी शिक्षण सभापती सुनील ( तात्या काटकर), सागर राजेमहाडिक, काका धुमाळ, बाळासाहेब ढेकणे (माजी नगरसेवक), यश राजेमहाडिक, रवी पाटील, सम्राट घेवारी, विश्वजीत पाटणकर, संदीप लोहार आदी मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.