सातारा : कराड ड्रग्ज प्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन परदेशी नागरिकांचाही सहभाग आहे.
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी सातारा जिल्ह्यातील अंमली पदार्थविरोधात मोहीम अधिक तीव्र केली आहे. त्या अंतर्गत कराड उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे एक पथक स्थापन केले होते. सुमारे एक महिना गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर कराड येथे सुरू असलेल्या अंमली पदार्थांविषयीच्या नेटवर्कची पाळेमुळे उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने ही कारवाई सुरू होती. या कारवाईत सुरुवातीस कराड येथील तीन जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आणखी चार पथके तयार करून त्यांना मुंबई, कोल्हापूर, पुणे तसेच इतर ठिकाणी पाठवण्यात आले. तपासामध्ये कराड मधील ड्रग्ज नेटवर्कची लिंक खूप दूरवर पोहोचल्याचे लक्षात आले. त्या अनुषंगाने मुंबई येथून दोन परदेशी नागरिकांना शिताफीने अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ड्रग्ज देखील जप्त करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत याप्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे.
यामध्ये राहुल अरुण बडे, समीर उर्फ सॅम जावेद शेख, तौसीब चांदसो बारगीर, अशोक दोडमणी, फैज दिलावर मोमीन, अमित अशोक घरत, दीपक सुभाष सूर्यवंशी, बेंझामिन एना कोरू (आफ्रिकन खंड), रोहित प्रफुल्ल शहा, सागना इमॅन्युअल (सेनेगल देश), नयन दिलीप माघाडे आणि प्रसाद सुनील देवरुखकर यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक लाख 14 हजार 350 रुपये किंमतीचे 37 ग्रॅम गुंगीकारक एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये डेटा अॅनालिसिस व गोपनीय यंत्रणांचा परिणामकारक वापर केला गेला. एमडी ड्रग्ज विरोधात सातारा जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई असून यामुळे नशामुक्त जिल्हा या संकल्पनेला बळ मिळालेले आहे. या कारवाईची व्याप्ती वाढली असून त्यावर वेगाने तपास सुरू आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे वाचक सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, संतोष सपाटे, संताजी जाधव, आसिफ जमादार, प्रवीण पवार, सागर बर्गे, दीपक कोळी, मयूर देशमुख, अनिकेत पवार, वैभव पवार, संग्राम भुताळे, राजाराम बाबर तसेच कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी, अशोक भापकर, निलेश तारू, पोलीस उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील, सतीश आंदेलवार, दीपक वागवे, पोलीस अंमलदार अनिल स्वामी, संग्राम पाटील, उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि रवींद्र भोरे, पोलीस अंमलदार मयूर थोरात, सायबर चे महेश पवार, यशवंत घाडगे, प्रशांत मोरे, ओमकार डुबल, रामदास भास्करवाड, रणजीत कुंभार, रेश्मा तांबोळी यांनी सहभाग घेतला. याप्रकरणी पोलीस नाईक सागर बर्गे यांनी फिर्याद दिली आहे.