प्रारुप प्रभाग रचनेवर प्राप्त सर्व हरकर्तीची सुनावणी ४ ऑगस्ट रोजी

by Team Satara Today | published on : 31 July 2025


सातारा : सातारा जिल्ह्यातील ६५ निवडणूक विभाग व १३० निर्वाचक गणांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी सदस्य संख्या निश्चीती व प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यास अनुसरुन, सातारा जिल्ह्यातील ६५ निवडणूक विभाग व १३० निर्वाचक गणांवर दि. १४ जुलै रोजी प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिध्द करणेत आलेली आहे.   दि.१४ जुलै ते दि.२१ जुलै अखेर निवडणूक विभागावर ५६ व निर्वाचक गणावर ४४ अशा एकूण १०० हरकती प्राप्त झालेल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारुप प्रभाग रचनेवर प्राप्त सर्व हरकर्तीची सुनावणी झुंबर हॉल, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे विभाग, पुणे येथे दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता घेणेत येणार आहे. ज्या व्यक्तींनी प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती घेतलेल्या आहेत त्यांनी वरीलप्रमाणे नमुद ठिकाणास व दिनांकास वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिला बचत गटांसाठी दहा जिल्ह्यांत उमेद मॉल
पुढील बातमी
साताऱ्याच्या साहिल जाधवचा जर्मनीत झेंडा

संबंधित बातम्या