सातारा : सातारा शहरातील जरंडेश्वर नाका येथे आज सकाळी डंपर, दुचाकी आणि चारचाकी यांचा तिहेरी अपघात झाला. या अपघातात एक जण जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, डंपर व चारचाकी वाहनामधील धडक टाळण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाला. अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.दरम्यान, जरंडेश्वर नाका हा परिसर अपघाताचा ‘ब्लॅक स्पॉट’ बनत चालल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. याच ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.या ठिकाणी सिग्नल यंत्रणा, वेगमर्यादा फलक, स्पीड ब्रेकर तसेच वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आह