सातारा : स्वस्थ राष्ट्र उभारणीच्या ध्येयाने काम करणाऱ्या पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या चिमुकल्यांनी मंगळाई टेकडीवरील झाडांना पाणी घालून श्रमदान केले. इयत्ता पाचवी मधील सुमारे अडीचशे विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यामध्ये भाग घेतला.
शिस्त, गुणवत्ता आणि दर्जा यामुळे नावाजलेल्या पोदार इंटरनॅशनल स्कूलचे एडमिन ऑफिसर मनोज जाधव, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी अजिंक्यता-या जवळच्या मंगळाई टेकडीवर आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात पर्यावरण जागृतीच्या घोषणा देत श्रमदानाला सुरुवात केली. दर शनिवारी मंगळाई टेकडीवर लोक सहभागातून झाडांना पाणी देण्याचा उपक्रम राबवला जातो. स्वच्छ साताऱ्याबरोबरच स्वच्छ पर्यावरणासाठी नागरिकांनी यामध्ये योगदान द्यावे असे आवाहन हरित सातारा तर्फे यावेळी करण्यात आले.
या श्रमदानामध्ये पोदार स्कूल बरोबरच हरित साताराचे कन्हैयालाल राजपूरोहित, दत्तात्रय चाळके, निलेश कुमठेकर, भालचंद्र गोताड, अंकुश मांडवकर, संजय झेपले, प्रगती जाधव पाटील, जगदीश कोष्टी, विकास बहुलेकर, राजेश पुराणिक, उमेश खंडूजोडे, दशरथ रणदिवे, शैलेंद्र पाटील आदींनी भाग घेतला.