कऱ्हाड, दि. १० (प्रतिनिधी)- कऱ्हाड उत्तर मतदारसंघातील गावांतर्गत विविध विकास कामांसाठी आमदार स्थानिक विकास निधीतून ९६ लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार मनोज घोरपडे यांनी दिली.
कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघामधील कोणेगाव (ता. कऱ्हाड) येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरणासाठी दहा लाख, कोर्टी (ता. कऱ्हाड) येथे सभामंडप बांधण्यासाठी १० लाख, बाबरमाची येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर सभामंडप बांधण्यासाठी पाच लाख, भगतवाडी येथे आरसीसी गटार बांधण्यासाठी १० लाख, मसूर येथे स्मशानभूमीत शेड करण्यासाठी आठ लाख, सातारा तालुक्यातील अपशिंगे (मि.) येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी १० लाख, गुजरवाडी (ता. कोरेगाव) येथे रहिमतपूर- तारगाव मार्ग ते मारुती मंदिरापर्यंत काँक्रिटीकरण करण्यासाठी १० लाख.
पिंपरी (ता. कोरेगाव) येथे ग्रामपंचायतीसमोरील झेंडा चौकात काँक्रिटीकरण करण्यासाठी १० लाख, बोरगाव (ता. कोरेगाव) येथे रस्ता काँक्रिटीकरणासाठी आठ लाख, वेणेगाव (ता. जि. सातारा) येथे रस्ता काँक्रिटीकरणासाठी पाच लाख, विरवडे (ता. कऱ्हाड) येथे सभामंडपासाठी १० लाखांचा निधी मंजूर झाला. या कामांमुळे गावातील दळणवळण सुलभ होणार असून, स्वच्छतेच्या दृष्टीने प्रत्येक गाव परिपूर्ण होणार आहे.