सातारा : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्यासमोर भांडणतंटा केल्याप्रकरणी महेश सपकाळ, कोमल सपकाळ, रेश्मा सपकाळ (सर्व रा.कोडोली) यांच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 2 एप्रिल रोजी घडली आहे. याप्रकरणी सोनाली भोसले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संशयितांनी पोलीस ठाण्यासमोर मोठमोठ्याने आरडाओरडा करुन शिवीगाळ, दमदाटी केली.