सातारा : मारहाणीसह दमदाटी केल्याप्रकरणी महिलेसह दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी सकाळी दहा वाजता सोमनाथ सुभाष मदने (रा. अमरलक्ष्मी, कोडोली) यांना त्यांच्या मेव्हण्याच्या घरात लोखंडी रॉडने मारहाण तसेच शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी संदीप (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) व मदने यांची पत्नी यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.