जरंडेश्वर नाक्यावर दुभाजकाला धडकून चारचाकी वाहन पलटी; दोनजण जखमी

by Team Satara Today | published on : 02 September 2025


सातारा : जरंडेश्वर नाक्यावर दुभाजकावरील पथदिवे बंद असल्याने चालकाला दुभाजकाचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्यांची चारचाकी गाडी एमएच 11 सीजी 1360 दुभाजकाला धडकली आणि पलटी झाली. या अपघातात गाडीतील दोघे जण जखमी झाले आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हा अपघात काल दि. 1 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. या रस्त्यावरील दुभाजकावर असलेले पथदिवे बंद असल्याने परिसरात पूर्णपणे अंधार होता. त्यामुळे चालकाला दुभाजक दिसला नाही आणि त्यांची गाडी थेट दुभाजकावर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की गाडी पलटी झाली.

अपघातानंतर गाडीतील प्रवासी अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने गाडीतील जखमींना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी अपघातग्रस्त गाडी रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. या अपघातामुळे जरंडेश्वर नाक्यावरील पथदिव्यांच्या स्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेची नोंद पोलिसात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहरात मोबाईल चोरी करणारी परप्रांतीय टोळी जेरबंद
पुढील बातमी
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी महिलेवर कारवाई

संबंधित बातम्या