सातारा : एका मुलाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास चंदन नगर कोडोली येथील एका महिलेच्या मुलाचे तेथीलच पाझर तलावा जवळून अपहरण करून त्याला मारहाण केल्याप्रकरणी दिग्विजय जाधव रा. करंडी, ता. सातारा व इतर तीन अनोळखी लोक यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गुरव करीत आहेत.