अजिंक्यतार्‍यावर महिलेस शिवीगाळ व मारहाणप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा

by Team Satara Today | published on : 11 June 2026


सातारा : मुलाच्या मैत्रिणीशी बोलण्यासाठी गेलेल्या महिलेस शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप एका महिलेविरुद्ध करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना 6 जून रोजी रात्री अजिंक्यतारा किल्ल्यावरील मंगळाई देवी मंदिर परिसरात घडली. तक्रारदार मंगल साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अल्फिया सय्यद हिने त्यांना दमदाटी करून मारहाण केली. त्यानुसार सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्महत्येच्या प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
सदरबझारमधील युवक बेपत्ता; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

संबंधित बातम्या