सातारा : मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी एसटी स्टँड जवळील सिव्हिल हॉस्पिटल रस्त्यावर ऋषिकेश चंद्रकांत इंगवले रा. देशमुख कॉलनी, सातारा यांना मारहाण केल्याप्रकरणी राहुल सयाजी जाधव रा. सैदापूर, कोंडवे, सातारा यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार मोहोड करीत आहेत.
दुसऱ्या तक्रारीत, राहुल सयाजी जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी ऋषिकेश चंद्रकांत इंगवले, अक्षय इंगवले, चंद्रकांत इंगवले यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार माने करीत आहेत.