दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सातारा शहरातून दोन युवती बेपत्ता

by Team Satara Today | published on : 16 June 2026


सातारा : शहरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन युवती बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील एका उपनगरात राहणारी 25 वर्षीय युवती राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत, दि. 6 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास करंजे पेठेतून एक अठरा वर्षीय युवती राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार ननावरे करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
मधमाशा पालन करणा-यांना मिळणार 50 टक्के अनुदान योजनेचा लाभ

संबंधित बातम्या